ब्रेन या शब्दाचा कालानुक्रमी विकास
ब्रेन या शब्दाचा विकास कसा होत गेला हे पाहणे उद्बोधक आहे. प्रथम शृब्दाची व्युत्पती होते. तेव्हा शब्दाची कळी असते. पुढे ती उमलत जाते. शब्द विकसित होत जातो. त्याच शब्दाला निरनिराळे अर्थ प्राप्त होतात. शब्द सिद्ध व समृद्ध होत जातो. शब्द बहुविध रूपात वापरला जातो. शब्दाच्या विकासाचा इतिहास हा मानवी विचारांचा, प्रज्ञेचा, प्रतिभेचा व संस्कृतीचा इतिहास …